Total Pageviews

RECIPE

पाव भाजी RECIPE पाककृती 

साहित्य

  • बटाटे …………………………………………………..४ मध्यम
२     टोमॅटो …………………………………………………४ मध्यम
३     फूल गोभी (फ्लॉवर)………………………………….१/४ लहान
४     कांदे …………………………………………………… २ मध्यम
५     आले …………………………………………………… १ इंच
८     लसूण ………………………………………………….. ८ – १० पाकळ्या
९     हिरवी शिमला मिरची …………………………………..१ मध्यम
१०    हिरव्या मिरच्या ………………………………………….३-४
११    ताजी कोथिंबीर ……………………………………………..१/४ कप
१२    सोललेले मटार ……………………………………………..१/४  कप
१३    लिंब ……………………………………………………………२
१४    तेल ………………………………………………………………. ३ टेबल स्पून (चमचे)
१५    मीठ ……………………………………………………………….. चवीनुसार
१६    पाव भाजी मसाला ………………………………………………… १ १/२ टेबल स्पून (चमचे)
१७    बटर (लोणी)……………………………………………………………३ टेबल स्पून (चमचे)
१८    पाव …………………………………………………………………. ८

पूर्व तयारी

  • प्रथम चरण
सर्व प्रथम बटाटे उकडून , थंड करून , सोलून घ्यावेत . फ्लॉवर धुवून किसून घ्यावा. कांदे सोलून, धुवून बारीक चिरून घ्यावेत. आले लसूण सोलून धुवून त्याची वाटून पेस्ट करावी.
  • द्वितीय चरण
शिमला मिरची धुवून त्यातील बिया काढून टाकून ती बारीक चिरून घ्यावी. त्याचप्रमाणे हिरव्या मिरचीला ही धुवून , देठ काढून बारीक चिरून घ्यावे.
  • तृतीय चरण
ताजी कोथिंबीर निवडून , धुवून  बारीक चिरून घ्यावी.मटार चे दाणे धुवून मिठाच्या पाण्यात मऊ उकडून घ्यावेत व नंतर पाण्यातून काढून हलके कुटून घ्यावेत. लिंबाच्या फोडी कराव्यात.

कृती

  • प्रथम चरण
एका पॅन मध्ये तेल गरम करावे व त्यात ३/४ एव्हढे कांदे घालावेत. १/४ कांदे बाजूला ठेवावेत.
गुलाबी रंगावर परतल्यावर त्यात हिरव्या मिरच्या व आले लसूण पेस्ट घालावी.मिनिट भर परतावे.
  • द्वितीय चरण
आता त्यात चिरलेल्या टॉमेटोंपैकी अर्धे घालावे व ३ ते ४ मिनिटे हलवत शिजू द्यावे. तेल सुटू लागले कि शिमला मिरची, व उकडलेले मटार , फ्लॉवर आणि बटाटे ही घालावे व उकळी आल्यावर १० मिनिटे मंद आंचेवर शिजू द्यावे. मध्ये मध्ये चमच्याच्या मागील बाजूने दाबत एकजीव करत राहावे. सर्व भाज्या एकजीव होईस्तो असे करावे.
  • तृतीय चरण
आता यात पाव भाजी मसाला, मीठ, उरलेले टोमेटो घालावे व हे मिश्रण २ मिनिटे मंद आंचेवर ठेवावे. मध्ये मध्ये ढवळत राहावे.
  • चतुर्थ चरण
आता एकूण बटर मधील अर्धे जाड तापलेल्या तव्यावर/ पॅनवर घालावे. प्रत्येक पावाचे २ काप करून ते या बटर वर परतावे. आलटून पाल्टून फिरवावे म्हणजे ते सोनेरी व कुरकुरीत होतील .
  • अंतिम चरण
आता ही तयार भाजी बारीक चिरलेली कोथिंबीर व उरलेले बटर याने सजवून गरमागरम वाढा.
भाजलेले पाव ,चिरलेला बारीक कांदा व लिंबाची फोड ही बरोबर द्या.

No comments:

Post a Comment